आठवणींचा हिंदोळा

मला घरची आठवण येते! मला घरी जाऊद्या “. लहान मुलं शाळेत बरेच वेळा असेच रडतात. छोट्याशा अमिशानी पुन्हा लगेच हसतात. किती सोपे असते मुलांचे सुख-दुःख, निदान त्या दुःखाच निवारण करणं अपल्या हातात तरी असतं. पण मोठं झाल्यावर सगळ्या गोष्टी सोप्या नाही राहत.

लहानपणीचे दिवस सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य सोडून जातात. मोठेपणी मात्र सगळंच बदलतं. निरागस क्षणांची जागा विचार पूर्वक केलेले निर्णय घेतात. मनानी नाही तर आपण बुद्धीनी ठरवतो. असाच एक निर्णय म्हणजे आपला देश आणि आपल्या लोकांना सोडून म्युनिकला राहायचा निर्णय, जो आवश्यक तर आहे पण कधीकधी मनाला टोचणारा पण आहे.  कारण, आठवण तर येते! जिथे वाढलो, ज्यांच्या सोबत इतके वर्ष राहिलो, त्यांच्याशी संपर्क आता फक्त फोन वरच असतो.

म्युनिक मधे राहणाऱ्या भारतीयला कशाची आठवण येत असेल? सर्वात आधी, घरची आणि घरात राहणाऱ्या लोकांची.  समजा नवरा बायको सोबत नसेल तर सर्वात जास्त त्याची / तिची. नेहमी सोबत राहायचं ठरलं होतं, पण या विरहाला ईलाज नाही. जीवन संगिनी असुन, संग नाही! पण आशा आहे लवकर सोबत होण्याची.  या आशेत कठीण दिवस पण सोपे होतात. एकमेकांना धीर देऊन आपला त्रास कमी होतो. मुलं, ज्यांच्या खेळण्यानं घरी आनंद नांदतो, निरागस प्रेमासाठी ऑफिसहून घरी यायची घाई होते, ते मुलंच घरी नसतील तर घर हे घर कसं वाटेल? फोन वर ते विचारतात, “बाबा तू घरी कधी येणार?  माझ्यासाठी काय आणशील?” या गोड प्रश्नानी डोळे भरतात आणि चेहरा हसतो. त्यांना, भेटायची ओढ आपली परीक्षा पाहते. ज्यांच्या गोंधळ आणि मस्तीचा कधी त्रास व्हायचा, आता त्यांच्या घरी नसण्याने शांतता पण सहन होत नाही. घरी यावंसं कसं वाटेल…!

जीव लावणारे मित्र-मैत्रिणीनी, “माझी गाडी खराब झालिये! मला pick करते / करतो?”. “पोहे भीजत टाकले आहे, पाहिले तर बटाटे संपले! शेजारुन पटकन आणले दोन बटाटे आणि झाले बटाटे पोहे”. “चहा करतेय, येते का ग?”, “घाईचे काम आलाय, थोड्या वेळ तुझ्याकडे मुलाला सोडुन जाऊ का?”  हक्कानी बिन्दास्त होउन ज्या मैत्रिणी जवळ आपल्या मुलं सोडू शकते असे शेजारच्यांची आठवण येते. जिवलग मित्र मैत्रीणी नसेल तर आयुष्य किती निरस आहे. गरज पडली की ऑफिस हुन धाऊन येणारे, मस्ती मज्जा करणारे, गप्पा-गोष्टी करणारे मित्र नेहमी आठवतात.  इथे पण झाले असतील सर्वांचे मित्र, पण आपण नवीन मित्र झाले तर जुन्या मित्रांची आठवण येत नाही का?

दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी, होळी, राखी पौर्णिमा, गुडी पाडवा… सण छोटा असो मोठा असो, आपल्या लोकांसोबत साजरा करायची मज्जा काहीतरी वेगळीच असते.  गणपती मिरवणूकचा जल्लोष, होळीचा धमाल, दिवाळीचा हर्ष-ओल्लास, महाशिवरात्रीच्या मंदिरातील मोठी रांग, मकरसंक्रांतीचा हळदी-कुंकू ह्या सर्व सणां मधे आपल्या देशाचा सुगंधा आस्तो. नटलेल्या बायका, बाजारातली गर्दी, फराळ करणारी आई, नातेवाईकांसोबतच्या गप्पा-गोष्टी आणि ओतप्रोत् होणारा उत्साह. सण वारांनची मजा आपल्या देशा सारखी कुठेही नाही. या दिवसात घरची खुप आठवण येत!

लग्न कार्य, साक्षगंध, बारसं, केळवण, एकषष्टी, मित्र मंडळी आणि नातेवाईकां सोबत उत्सव साजरं करायला काय मजा येते. घरातल्या आजी आबां पासून ते लहान मुलं सगळेच उत्साहित असतात. नवीन कपडे, दागिनेच नाही तर त्या समारंभाची व्यवस्था करण्यात पण सगळ्यांची रुची असते.  मेनू मधे काय गोड ठेवावं? डेकोरेशन कसा करावा? डेकोरेशन कोण कोण करेल? दीर-जाऊ, वाहिनी- बहिणी, सगळे एकत्र येतात आणि खूप मजेशीर सगळे कामं पार पाडतात.  लग्नात नवीन सुनेचं गृह प्रवेश असो किंवा मुंजीचा रुखवत, सोबत असले तर कामं निम्मे आणि मजा द्विगुणीत होते. कोणी पाहुण्यांना एअरपोर्ट/रेल्वे स्टेशन सोडणं पोहचवणं करतं, तर कोणी सामानाची जवाबदारी घेतो. मुलांना तर अशा वेळेस दंगा करायची पूर्ण सूट अस्ते. कपडे नवीन असेले तर काय, आम्ही पूर्ण कार्यालय मापून बघु. काय सुंदर दृश्य निर्माण होतं डोळ्या समोर. पैठणी नेसलेल्या बायका, कुर्ता-पैजामा मधे पुरुष आणि परकर-पोलकं आणि शेरवानी मधे गोड दिसणारे लहान मुलांचा हल्ला! प्रत्येक्षात असे दृश्य पाहिलं मन अधीर होतं!

कोणताही उत्सव, पर्व, सण, किंवा सोहळा, यांच्या तैयारीची सुरुवात बाजार पासूनच होते. आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या काळात पण, बाजारातल्या खरेदीची मज्जा वेगळीच आहे. भाजी मार्केट असो किंवा तुळशी बाग, रस्त्यावरचे ठेले आणि त्यात भाव करणाऱ्या बायका, गर्दी मधे parking शोधणारे लोकं, साड्यांच्या शोरूम मध्ये साडी नेसून दाखवणारे सेल्समन असो किंवा हातात बांगड्या भरवणारी आजी. आज पण आपल्या कडे बाजारातला दृश्य असच असतो.  शॉपिंगची मज्जा आणि उत्साह निराळा असतो. मैत्रिणींन सोबत, आई सोबत, कंटाळलेला नवऱ्या सोबत किंवा हट्टीपणा करणारे मुलांसोबत, बायकांना आपल्या देशातल्या शॉपिंगची आठवण नक्कीच येत असेल.

भारतीय भोजनची सर्वांनाच आठवण येत असेल. मग ते हाय-फाय फाइव्हस्टार रेस्टॉरंटच जेवण आसो किंवा, रस्त्यावारच्या पाणी-पुरीचा स्टॉल. घरगुती पोळी भजी केंद्र, दावणगिरी बेंने डोसा, परंपरिक मराठी थाळी, चौपाटीची पाव भाजी, रेल्वे स्टेशन वर मिळणारा वडा पाव. आपल्य भरतीया जेवणच काही तोड नाही.  चटपटीत चाट,  झणझणीत मिसळ आणि तोंडाला पाणी सुटेल असं दिवाळीचा फराळ; अनरसे, करंज्या, चिवडा-लाडू आणि शंकरपाळी. असा वाटते की चितळे बंधू मिठाईवाल्यानी आपली एक शाखा म्युनिक मध्ये देखिल उघडावी. म्हणजे, आंबा बर्फी, बाकरवडी, श्रीखंड इथे पण मिळेल. देशाच्या बाहेर आल्यावर आपल्या जेवणाची किती आठवण येते याला मर्यादा नाही. मला तर पिझ्झा आणि चायनीज पण आपल्या देशाचाच आवडतं, त्यामुळे बाहेर जेवायचा उत्साह पूर्वी सरखा राहिलाच नाही.

आपल्या देशात आपल्या गावात, कामवाल्या मावशीचं आपल्याला किती आधार असतो ना? हे तर सगळे मानतील कि, आपल्या देशात आपण यांच्या वर किती अवलंबून असतो.  दोन दिवस न सांगता सुट्टी झाली तर वाट लागते. पण इथे तर त्यांच्याशिवाय जेव्हा सगळ्या कामाचा भार पडतो तर किती त्रास होतो. Lockdown मुळे, तस तर सर्वांनाच घरकाम करणाऱ्या बायांशिवाय घर चालवणं शिकवल आहे. पण सुरवातीला इथे ना पोळ्या करणाऱ्या मावशी ना धुणेभांडेच्या मावशी येणार या गोष्टीची कमी जाणवते, तेवढंच नाही तर आपल्याशी दोन शब्द बोलायला कोणी तरी भेटतं. सुरवातीला तर किती दिवस निघून गेले जेव्हा मी कोणाला पण भेटली नही, कोणाशी पण बोलली नही, खूप जाणवतं अश्या वेळेस त्याची पण कमी. आमच्या पोळ्यावाल्या मावशीची मुलगी फारच हुशार आहे! अभ्यासात पण आणि खेळात पण! त्या सांगतात तेव्हा आम्हाला पण अभिमान वाटतो त्यांच्या लेकीचं. जेव्हा ती नॅशनल मध्ये जिंकली आणि जेव्हा तिला दहावित छान अंक पडले! त्यांच्या रोजच्या भेटीनी त्यांच्याशी पण नातं तैयार होत.

काय काय लिहूं आणि काय नाही, आठवणींचे दृश्य डोळ्या समोर येतात. आपली माती, आपली भाषा सगळ्यानची आठवण येते. भारतीय चेहरांना पाहूनच आनंद होत. चुकून कानांवर हिंदी मराठी पडली, की शोधू लागतो कुठून आवाज आला. ऋणानुबंध मातीचे विसरू शकत नाही, नातं माझ्या देशाशी या आयुष्यात तरी सुटू शकत नाही ! एका जाणत्या कविनी सुंदर चारोळी लिहिले आहे, त्यांनीच या लेखाचे समापण करते….

कधी वाटते लिहावे…
कधी वाटते नुसतेच गावे…
आठवणींचे हिंदोळे हे, आज कहरून यावे!

कधी वाटते खळखळून हसावे..
कधी तर उगीच मन हळवे झाले….
आठवणींच्या पावसात मी आज चिम्ब भिजावे…

नाती हे सर्वसाधारण नाही…
जपतांना तडजोड ही चालत नाही…
आठवणींच्या पुष्करणीत आज नात्यांना नवजीवन मिळावे..

आनंद आणि अश्रूचे सर्वांचे वाटे निभावे…
उन आणि पावसाचं चक्र असेच चालत राहावे..
आठवणींच्या पेढांनी सदा मन गोड़ करावे…

कुठे गुंतवू कुठे मन लावावे…
पुढे पाहू कि मागे चालत राहावे….
आठवणींच्या झोक्यात मी आज उन्मुक्त वाहावे…

-मीनल

This article has been published as an article in “Maharashtra Munich Mandal’s, Diwali Ank, Palavi in the year 2019. To visit the Diwali Ank please click the following link https://mmmunich.com/wp-content/uploads/2019/11/Diwali-Anka_MMM_2019.pdf

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: